नाशिक – शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात (कंटेनमेंट झोन) लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. १७ नोव्हेंबर रोजी शहरात केवळ ४२१ प्रतिबंधित क्षेत्र होते. मात्र, आता याच क्षेत्रांची संख्या तब्बल ७१८ झाली आहे. दिवाळीच्या काळात कोरोनाचे नियम न पाळल्याने शहरात रुग्ण वाढत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रात वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.
शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (१ डिसेंबर) २८२ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २३२ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख १ हजार ४१९ झाली आहे. ९६ हजार ७८८ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ७९८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ८३३ जण उपचार घेत आहेत.
मंगळवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १८४, ग्रामीण भागातील ७९, मालेगाव शहरातील ९ तर जिल्ह्याबाहेरील १० जणांचा समावेश आहे. तर, ७ मृतांमध्ये नाशिक शहरातील २ आणि ग्रामीण भागातील ५ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६६ हजार ८९८. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ७१८. पूर्णपणे बरे झालेले – ६४ हजार ४९०. एकूण मृत्यू – ९०६. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ५०२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.४०
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २९ हजार ३३३. पूर्णपणे बरे झालेले – २७ हजार ४७५. एकूण मृत्यू – ६७८.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार १८०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.६७
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ३३५. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ०४३. एकूण मृत्यू – १७१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १२१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.२६
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी