नाशिक – शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (१५ जानेवारी) २१७ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २७३ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख १३ हजार ३७३ झाली आहे.१ लाख ९ हजार ९८८ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत २ हजार ०२५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या १ हजार ३६० जण उपचार घेत आहेत. दरम्यान, नाशिक शहरातील कोरोना मृतांची संख्या एक हजारांच्या पुढे गेली आहे.
शुक्रवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात ९२, ग्रामीण भागातील ९३, मालेगाव शहरातील २६ तर जिल्ह्याबाहेरील ६ जणांचा समावेश आहे. तर, ४ मृतांमध्ये नाशिक शहरातील ३ आणि ग्रामीण भागातील १ जणाचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ७४ हजार ४३६. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४४२. पूर्णपणे बरे झालेले – ७२ हजार ६२५. एकूण मृत्यू – १००२. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ८०९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९७.५७
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३३ हजार १७७. पूर्णपणे बरे झालेले – ३१ हजार ९९२. एकूण मृत्यू – ७९८.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३८७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.४३
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ६८८. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ३५२. एकूण मृत्यू – १७५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १६१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.८३