नाशिक – शहराच्या काही भागात येत्या शुक्रवारी (१९ मार्च) पाणी पुरवठा होणार नाही. तसेच, शनिवारी सकाळचा पाणी पुरवठाही कमी दाबाने होणार आहे. तशी माहिती नाशिक महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.
गांधी नगर जलशुध्दीकरण केंद्रास पुरवठा करणारी मुख्य पीएससी (सिंमेट) 1200 मी.मी.व्यासाची रॉ-वॉटर पाईप लाईन गोविंद नगर जॉगिंग ट्रॅक, मनोहर नगर समोरील गांधीनगरकडे जाणारी पाईपलाईन नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे या जलवाहिनीचे काम तातडीने हाती घ्यावयाचे आहे. तसेच कालिका जलकुंभ येथील गुरुत्ववाहिनीची गळती थांबविण्यासाठी आवश्यक ते काम करावे लागणार आहे. परिणामी, शुक्रवार १९ मार्च रोजी सकाळचा, दुपारचा व संध्याकाळचा पाणी पुरवठा खालील भागात होऊ शकणार नाही. तसेच २० मार्च रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल, तरी याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे, ही विनंती.
या भागात पाणी नाही
नाशिक पुर्व मधील प्रभाग क्र. 14 भागश:, 15 भागश:,23 भागश:, 30 भागश: प्र.क्र. 16 पुर्ण
नाशिक पश्चिम मधील प्रभाग क्र. 7, 12 व 13 मधील संपुर्ण भाग
पंचवटी विभागातील प्रभाग क्र. 1,2,3,4,5 व 6 मधील संपुर्ण भाग
नाशिक रोड विभागातील प्रभाग क्र. 17, 18, 19, 20, 21 व 22
नविन नाशिक विभाग प्रभाग क्र. 25 भागश:, 26 भागश: व 28 भागश:
सातपुर विभाग प्रभाग क्र. 08, 9, 10,11,26 पुर्ण 27 चुंचाळे व दत्त नगर परिसर