नाशिक – येत्या शनिवारी (२ जानेवारी) शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तशी माहिती महापालिकेने दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे आहे कारण
मनपाचे मुकणे धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीचे रेमंड सबस्टेशन गोंदे येथुन 33 के.व्ही. वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. सदरचे सबस्टेशन मधील विद्युत विषयक कामे 33 के.व्ही. ब्रेकर उभारणी करणेकरीता दि. 02/01/2021 रोजी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 4.00 वाजेपावेतो महावितरण कंपनीकडुन वीजपुरवठा बंद ठेवण्यात येईल असे महावितरण कंपनीने कळविले आहे. मनपाचे विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र (मुकणे प्रकल्प) येथून होणारा पाणी पुरवठा करणे शक्य होणार नसल्याने नाशिक महानगरपालिकेमार्फत नाशिक पुर्व व नविन नाशिक विभागातील पाणी पुरवठा संबंधी खालील महत्वाची कामे अत्यंत तातडीची व अत्यावशक असल्याने ती करणे गरजेचे आहे.
या भागात पाणी नाही
शनिवार दिनांक 02/01/2021 रोजी नविन नाशिक मधील प्रभाग क्र.24,25,26,22 भागश: व 27,28,29,31 या संपुर्ण प्रभागांचा तसेच नाशिक पुर्व मधील प्रभाग क्र. 14,15,23, 30 भागश: या प्रभागामंध्ये (सकाळ व सायंकाळचा ) संपुर्ण दिवसभर पाणी पुरवठा होणार नाही. तसेच रविवार दिनांक 03/01/2021 रोजी पाणी पुरवठा कमी दाबाने होईल तरी सदर भागातील नागरीकांनी याची नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे ही विनंती.
ही होणार कामे
1) पाथर्डी फाटा येथे 1200 मी.मी. मुख्य गुरुत्ववाहीनीला जोडणारी 600 मी.मी. व्यासाचे जलवाहिनीवरील व्हॉलची दुरुस्ती करणे.
2) प्र.क्र.23 मधील सुचितानगर येथील नविन जलकुंभ भरण्याकरीता 500 मी.मी. व्यासाची गुरुत्ववाहीनीचे राष्ट्रीय महामार्गामध्ये असलेल्या 700 मी.मी. मुख्य गुरुत्व वाहीनीला क्रॉस कनेक्शन करणे.
3) प्र.क्र. 30 मधील राजीव नगर येथे 700 मी.मी. गुरुत्ववाहीनीच्या उपवाहीनीवरील 300 मी.मी. व्यासाच्या एमएस.टी बदलणे.
4) कथडा जलकुंभ येथील 500 मी.मी. व्यासाच्या व्हॉलची गळती बंद करणे.
5) नागसेन नगर येथील सर्व्हिस रस्त्यात 300 मी.मी. व्यासाच्या जलवाहीनीवर क्रॉस कनेक्शन करणे.