नाशिक – सातपूर विभागातील धुवनगर, बळवंत नगर, गणेश नगर,रामराज्य, नहुष हे पाच जलकुंभ भरणाऱ्या मुख्य उर्ध्व वाहीनीस मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली आहे. त्यामुळे सदर पाईप लाईन दुरुस्तीचे काम ताबडतोब हाती घ्यावे लागत आहे. म्हणून खालील भागात उद्या गुरुवारी दि. 29/10/2020 रोजीचा संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही, असे महापालिकेने कळविले आहे.
प्रभाग क्र.7 :- सहदेव नगर,आयाचीत नगर, दादोजी कोंडदेव नगर, प्रमोद नगर गितांजली सोसायटी,शांती निकेतन सोसायटी, जुने पंपिग स्टेशन परिसर, एस.टी.कॉलनी परिसर, श्रमिक नगर, सोसायटी इत्यादी परीसरात
प्रभाग क्र.8 :- बळवंत नगर, रामेश्वर नगर, सोमेश्वर कॉलनी, सदगुरु नगर, खांदवे नगर, पाटील लॉन्स गंगापुर ड, नवश्या गणपती परिसर, आनंदवली गाव परिसर, रामनगर, सावरकर नगर, नरसिंह नगर, गणेश नगर, निर्मल विहार, काळे नगर, विवेकानंद नगर, पाईपलाईन रोड परिसर व गुरुजी हॉस्पिटल मागील परिसर
तरी याची नागरिकांनी नोंद घ्यावी व महानगरपालिकेस सहकार्य करावे. ही विनंती.