दोन शस्त्रधारी जेरबंद
नाशिक : शहरात शस्त्रधारींचा सुळसुळाट झाला असून, वेगवेगळया ठिकाणी केलेल्या कारवाईत पोलीसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. संशयीतांच्या ताब्यातून दोन चॉपरसह तलवार अशी धारदार शस्त्र हस्तगत करण्यात आली असून याप्रकरणी सरकारवाडा आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हर्षल सुनिल पाटणकर (२१ रा.बेथेलनगर,शरणपूर) व अनिकेत संजय पगारे (१८ रा.आंबेडकर हौ.सोसा.आनंद रोड दे.कॅम्प) अशी अटक केलेल्या शस्त्रधारींची नावे आहेत. शरणपूररोडवरील रचना विद्यालया जवळ एका तरूणाकडे धारदार चॉपर असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकास मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.२८) युनिटच्या पथकाने सापळा लावला असता पाटणकर पोलीसांच्या जाळयात अडकला. संशयीताच्या अंगझडतीत दोन धारदार चॉपर मिळाले असून याप्रकरणी पोलीस शिपाई पालखेडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक धुळे करीत आहेत. दुसरा शस्त्रधारी देवळाली कॅम्प येथील अयम्मा मंदिर परिसरात मिळून आला. अनिकेत पगारे असे संशयीताचे नाव असून तो अय्यमा मंदिर भागात धारदार तलवार घेवून दहशत माजवित असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.२८) सायंकाळी कॅम्प पोलीसांनी धाव घेत त्यास ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यात धारदार तलवार मिळून आली. याप्रकरणी पोलीस कर्मचारी मनोहर साळुंके यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक गि-हे करीत आहेत.
……..
सातपूरला ८० हजाराची घरफोडी
नाशिक : दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्यांनी घरात घुसून कपाटातील ८० हजाराच्या दागिण्यांवर डल्ला मारला. ही घटना सातपूर कॉलनीत घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नईम सादिक सय्यद (रा. महाराष्ट्र हौसिंग कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शनिवारी (दि.२६) रात्री ही घटना घडली. सय्यद यांच्या घराचा दरवाजा अनावधानाने उघडा राहिला होता. ही संधी साधत चोरट्यानी प्रवेश करून हॉलमधील कपाटातून सुमारे ७९ हजार २०० रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. अधिक तपास जमादार राठोड करीत आहेत.
…….
तडीपार सोन्या झगडे जेरबंद
नाशिक : शहर व जिह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केलेले असतांना शहरात राजरोसपणे वावरणा-या तडीपार गुंडास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्पेश उर्फ सोन्या मनोज झगडे (२२ रा.भंडारी बाबा चौक,कुंभारवाडा) असे अटक केलेल्या संशयीत तडीपाराचे नाव आहे. झगडे याचा शहरात वावर असल्याची माहिती भद्रकाली पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.२८) त्याच्या घर परिसरात सापळा लावला असता तो पोलीसांच्या जाळयात अडकला. याप्रकरणी पोलीस कर्मचारी संजय पोटींदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक जाधव करीत आहेत.
……..
दोन दुचाकी चोरी
नाशिक : शहरात मोटारसायकली चोरीची मालिका सुरूच असून, नुकत्याच दोन मोटारसायकली चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी इंदिरानगर आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदिरानगर भागात राहणारे भुवानंद जराप्पा बंगेरा (रा.श्री इम्पेरियल अपा.सिटी गार्डन जवळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बंगेरा यांची शाईन दुचाकी (एमएच १५ सीझेड ५२७५) रविवारी (दि.२७) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार हादगे करीत आहेत. तर नाशिकरोड येथील मयुर दिलीप आंबेकर (रा. सिध्देश्वर कॉलनी,पॉलीटेक्नीक कॉलेज जवळ) यांची दुचाकी एमएच १५ जिके ५५०९ गेल्या मंगळवारी (दि.२२) रात्री बिटको पॉईंट येथील स्काय लाईन टॉवर या इमारतीखाली पार्क केलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार भोईर करीत आहेत.
…….
लिफ्टची बॅटरी चोरी
नाशिक : सोसायटीमधील लिफ्टची बॅटरी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना राजीवनगर येथे घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवेंद्र गोपाळ झोडगेकर (रा.रूंग्ठा रेसि.अपा.स्प्लेंडर हॉलमागे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रूंग्ठा रेसिडेन्सी या सोसायटीच्या लिफ्टसाठी बॅटरी बॅकअप साठी लावण्यात आलेल्या सुमारे २० हजार रूपये किमतीच्या सहा बॅट-या चोरट्यांनी चोरून नेल्या. अधिक तपास पोलीस नाईक जावेद खान करीत आहेत.
….