नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीयअध्यक्ष शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त नाशिक शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी अभिष्टचिंतन एका राजसु व्यक्तिमत्वाचे ! या शीर्षकाखाली ऑनलाईन निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. ऑनलाईन स्पर्धा सर्वांसाठी असून नाशिक शहरातील सर्व विभागातील स्पर्धक यात सहभाग नोंदवू शकतात.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा ८१ वा वाढदिवस १२ डिसेंबरला संपूर्ण देशात उत्साहात साजरा केला जातो. वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रम घेतले जात असतात. नाशिक शहर राष्ट्रवादी युवकच्या वतीने नाशिक शहरात ऑनलाईन निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शरद पवार ……एक स्व विचारधारा! व राजकिय योध्दा…….नाबाद ८०! असा निबंध स्पर्धेचा विषय असणार आहे. निबंध ३०० शब्दांचा असावा व स्वच्छ हस्ताक्षरात लिहुन पाठवावा. असे निबंध स्पर्धेचे नियम असणार आहे. तर शरद पवार यांचे प्रतिमाचित्र व शरद पवार यांच्या जिवनावरील क्षण चित्र हे चित्रकला स्पर्धेचे विषय असून चित्र स्पर्धकांनी स्वतः काढून त्याची योग्य रचना करावी, चित्र काढून चित्राचा स्पष्ट फोटो पाठवावा असे चित्रकला स्पर्धेसाठी नियम ठेवण्यात आले आहे. चित्र व निबंधासोबत स्पर्धकाचे संपूर्ण नाव, वय, पत्ता व संपर्क क्रमाक असणे गरजेचे असून दिनांक ९ डिसेंबर २०२० पर्यंत ([email protected]) यावर ईमेल वर ऑनलाइन पाठवयाचे आहे.अधिक माहितीसाठी ९०९६०८०८७९ या क्रमांकावर संपर्क करून माहिती घ्यावी. निबंध व चित्रकला स्पर्धा सर्व वयोगटातील स्पर्धकांसाठी खुली आहे. उत्कृष्ट चित्र व निबंधाला प्रथम ,व्दितीय व तृतीय अशा पध्दतीने आकर्षक परितोषिक दिले जाणार असून परितोषिक वितरणावेळी मूळ चित्र दाखवावे लागणार आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्ती पत्रक देण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केले आहे.