नाशिक – कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ज्या कार्यालयात गर्दी होते अशा कार्यालयात आता सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवारी कार्यालय सुरु ठेवण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक कार्यालयाने घेतला आहे. त्यामुळे शनिवारी नाशिक, मालेगाव, निफाड, येवला, नांदगाव, सिन्नर, बागलाण, दिंडोरी इगतपुरी ही कार्यालय २० व २७ मार्च रोजी सुरु राहणार आहे. या दोन्ही तारखेला शनिवार आहे. त्यासाठी सह जिल्हा निबंधक वर्ग १ कैलास दवंगे यांनी आदेश काढला आहे……