नांदगाव – आंतरराष्ट्रीय स्तरावर १० वी च्या विद्यार्थांसाठी घेण्यात येणारी NATIONAL SCIENCE OLYMPIAD परीक्षा दरवर्षी घेण्यात येते. या परीक्षेच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत होते व संशोधन करण्यासाठी सहाय्यभूत ठरते. या परीक्षेत नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नांदगावव येथील व्ही.जे.हायस्कूलचा विद्यार्थी वेदांत पोपटराव घुगे या विद्यार्थ्यांने आंतरराष्ट्रीय स्तरावर पारितोषिक मिळविले.
ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने ३० जानेवारी २०२१ रोजी संपन्न झाली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत भारतातील अनेक राज्यातील व देशा बाहेरील विद्यार्थी यात सहभागी होत असतात. यातून पश्चिम विभागातील महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजराथ, गोवा या राज्यातील विद्यार्थी सहभागी होतात. यातून वेदांतने या विभागातून तिसरा क्रमांक मिळवून सिल्वर पदक मिळविले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर १४ वा क्रमांक मिळवला आहे. वेदांतने या आधीही अनेक स्पर्धा परीक्षेत बक्षिसे मिळविलेले आहेत. पितृ छत्र हरपले असूनही प्रतिकूल परिस्थितीत नियमितपणे अभ्यास करून या विद्यार्थाने हे यश मिळवले आहे.
वेदांत यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर बक्षिस मिळवल्याबद्दल संस्थेचे सेक्रेटरी आश्विनकुमार येवला, शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे, संकुल प्रमुख शशिकांत आंबेकर, मुख्याध्यापक दयाराम अहिरे, पर्यवेक्षक भास्कर जगताप, प्रकाश गरुड, भैय्यासाहेब चव्हाण, भास्कर मधे व शाळेतील सर्व शिक्षक,विद्यार्थी यांनी त्याचे अभिनंदन केले.