नाशिक : शहरात आत्महत्येची मालिका सुरूच असून मंगळवारी (दि.१२) वेगवेगळया भागात राहणा-या चौघांनी आत्महत्या केली. त्यातील तीघांनी तर एकाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. त्यात एका महिलेचा समवेश आहे. संबधीतांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी म्हसरूळ,मुंबईनाका सातपूर व सरकारवाडा पोलीस ठाण्यात मृत्युंची नोंद करण्यात आली आहे. पेठरोडवरील राहू हॉटेल भागात राहणारे जगदिश ढवळू भुसारे (रा.विनीशा व्हिला रो हाऊस,म.बाद रोड) यांनी सोमवारी मध्यरात्री आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ नजीकच्या संजीवणी हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हारूग्णालयात हलविले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पारणकर करीत आहेत. दुसरी घटना विनयनगर भागात घडली. अनिलकुमार विजयकुमार सिंग (४७ रा.अश्विनी अर्पा.) यांनी मंगळवारी आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून छताच्या लोखंडी हुकाला शाल बांधून गळफास लावून घेतला होता. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बबन शिंदे करीत आहेत. औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात राहणाºया शिरीन विलाल शेख (२४ रा.बौध्दविहार समोर) या महिलेने मंगळवारी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. कुटूंबियांनी तिला जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले.याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक सिध्दपुरे करीत आहेत. तर कॉलेजरोड भागातील पाटील लेन.नं.३ मध्ये राहणारे अश्विनकुमार आनंदीलाल वर्मा (२३ रा.पटवर्धन अपा.) या युवकाने सोमवारी शरणपूररोड भागात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. सप्तशृंगी बिल्डींग मधील पतंग हॉटेल खाली तो अत्यवस्थ अवस्थेत मिळून आल्याने त्याच्यावर पंडित कॉलनीतील सुश्रृत हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गावीत करीत आहेत.
……