मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – वीजबिल सक्तीची वसुली थांबवावी, भाजपचे आंदोलन

by India Darpan
फेब्रुवारी 5, 2021 | 8:35 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210205 WA0030

महावितरण व राज्यशासनाने ग्राहकांची सक्तीची वीजबिल वसुली थांबवावी – आ.प्रा. देवयानी फरांदे  

नाशिक – महावितरणने वीजबिल न भरल्यास ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवली असून हे महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप आहे. कोरोना काळात अवाजवी वीज बिल आल्यावर ती बिलं भरण्याची क्षमता सामान्य माणसाकडे नाही. विविध कारणांनी संकटात आलेला शेतकरीही वीज बिल भरण्याच्या अवस्थेत नाही. अवाजवी बिलं दुरुस्त करण्याची घोषणाही प्रत्यक्षात आली नाही. कोरोना प्रसारापूर्वी महाविकासआघाडीच्या ऊर्जामंत्र्यांनीच १०० युनिट पर्यंतचे वीज बिलं माफ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु हे आश्वासनही प्रत्यक्षात आले नाही. जर दिलेली आश्वासने पूर्ण करायची हिम्मत महाविकासआघाडी सरकार मध्ये नसेल तर निदान अशी सक्तीने वीज बिलं वसूली करणे थांबवावे नाही तर भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून पुन्हा जन आंदोलन करेल अशा इशारा भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस तथा आमदार देवयांनी  फरांदे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

भाजप सरकारच्या काळात कधीच शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची सक्ती केली नाही. यामुळे थकबाकी वाढली तरी तो भार राज्य सरकारने स्वत:वर घेतला. भाजपचे सरकार असतांना कृषी क्षेत्रासाठी साडेसात लाख नवीन वीज जोडण्या दिल्या. पण वीज कंपन्यांही फायद्यात राहील्या होत्या. जर भाजप सरकारला हे शक्य होते तर आताच्या महाविकास आघाडी सरकारला कठिण आहे का? असा सवालही आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी सरकारला विचारला आहे.

अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना आणि सर्वसामान्य जनतेला महाविकासआघाडी सरकारने अडचणीत टाकू नये. कोरोना काळात जनतेला वीज बिल माफीचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीज बिल वसूली करून जनतेला नाहक त्रास देत आहे. थकीत बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेणारे हे सरकार किती असंवेदनशील आहे हे यावरून दिसून येते. मात्र भारतीय जनता पार्टी या महाविकासआघाडी सरकारला मनमानी कारभार करू देणार नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिलासा देण्यासाठी जनताभिमुख अर्थसंकल्प जाहीर केलेला असून त्याचेच अनुकरण राज्यसरकारने करून राज्यातील जनतेला दिलासा द्यावा असेही आ.फरांदे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी भाजप ज्येष्ठ नेते लक्ष्मण  सावजी, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा  सौ. हिमगौरी आडके, मध्य पश्चिम मंडल अध्यक्ष देवदत्त जोशी, नगरसेवक प्रशांत जाधव, मा. नगरसेवक हरिभाऊ लोणारी, नगरसेविका स्वाती भामरे, गणेश कांबळे, अमित घुगे,  पवन भगुरकर, देवा जाधव, यांच्यासह आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इतर बाबतीत गुजरातशी स्पर्धा करतात, मग पेट्रोलच्या दराबाबत का नाही, आमदार फरांदेचा सवाल

Next Post

अखेर ठरलं ! मराठा आरक्षणावर केंद्रही मांडणार बाजू

India Darpan

Next Post
maratha reservation

अखेर ठरलं ! मराठा आरक्षणावर केंद्रही मांडणार बाजू

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

goldBYQF e1743933825463

मुंबईत तस्करीचे सोने वितळवणारा अवैध गोल्ड मेल्टिंग कारखान्याचा पर्दाफाश…सात जण ताब्यात, ९ कोटीचे सोने जप्त

जून 24, 2025
Screenshot 20250623 224646 Collage Maker GridArt

धक्कादायक…मुलीला नीट परिक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू

जून 24, 2025
Corruption Bribe Lach ACB

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवकसह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

जून 24, 2025
Shelar1

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही… मंत्री ॲड. आशिष शेलार

जून 24, 2025
भुसावळच्या सानवी सोनवणेनं आंतरराष्ट्रीय स्केटिंग2 1023x1536 1 e1750728227396

भुसावळच्या सानवी सोनवणेने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले दोन सुवर्ण व तीन रौप्य पदक

जून 24, 2025
cm tribhasha meeting 875x420 1

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011