नाशिक – त्र्यंबकेश्वर रोडवर अंजनेरीजवळ गेल्या वर्षी सुरु झालेले नाशिक फ्लॉवर पार्क आता नऊ महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा १८ डिसेंबर रोजी सुरु होणार आहे. आता हे फ्लॅावर पार्क दुप्पट जागेत असणार आहे. त्यात नवीन संकल्पनेचा समावेश करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी १ जानेवारीला दुबई येथील मिरकल गार्डनच्या धर्तीवर उद्योजक शशिकांत जाधव यांच्या संकल्पनेतून हे फ्लॉवर पार्क सुरु करण्यात आले होते. १५ मार्चला ते बंद करण्यात आले. सिझनेबल थीम असली तरी तीन महिन्यात या पार्कला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. आता पुन्हा ते सुरु होणार आहे. लॅाकडाऊनमुळे बाहेर न पडू न शकलेल्या पर्यटकांना यामुळे आनंद घेता येणार आहे. हे पार्क सुरु करतांना कोव्हीड संबधी सर्व नियमांचे पालनही केले जाणार आहे. लिमिटेड एंन्ट्री देण्याचे नियोजन आहे.
गेल्या वेळेस या उद्यानात पिटोनिया, झेनिया, डायनथस, पॅन्सि, एरेंथियम, कोलिअस, वडेलिया, लेडीबर्ड कॉसमस आदी फुलझाडांची आकर्षक लागवड करण्यात आली होती. गुलाब, झेंडू, सूर्यफूल, कमळ, बोगनवेल या फुलांचाही या पार्कमध्ये समावेश होता. विविध वेलींचा व फुलांचा वापर करून मोर, हत्ती, शहामृग, शेतकरी आदी प्रतिकृती उभारण्यात आले होते. पण, आता नव्या संकल्पनेने साकारण्यात आलेला हा पार्क कसा असेल याची उत्सुकता पर्यटकांना असणार आहे. त्याची झलक असलेला हा व्हिडिओ……