नाशिक : विवाह सोहळय़ात मोलकरणीने आपल्या मालकीनीच्या दागिण्यांवर डल्ला मारल्याची घटना मायको सर्कल भागात घडली. वधू वराची हळद उतरविण्यात कुटूंबियांसह नातेवाईक गंगु असल्याची संधी साधत भामट्या महिलेने कपाटातील तब्बल चार लाख रूपये किमतीचे दागिणे पळविले असून, याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिता नेहरे (रा.महादेववाडी,सातपूर) असे संशयीत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मेघा सुर्यवंशी (रा.नयनतारा हिलस,मायको सर्कल) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाचे लग्न असल्याने सुर्यवंशी कुटूंबियांनी संशयीत नेहरे या महिलेस घरकामासाठी कामावर ठेवले होते. ९ डिसेंबर रोजी वधू वराची हळद उतरविण्यात कुटूंबियांसह नातेवाईक व्यस्त असल्याची संधी साधत भामट्या महिलेने बेडरूममधील कपाटातून ४ लाख २ हजार रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक प्रविण शिंदे करीत आहेत.