नाशिक – मुंबई – आग्रा महामार्गवरील सर्व्हिस रोड लगत विल्होळी गावासमोर असलेल्या एका कंपनीच्या आवारात भंगार साहित्याला सोमवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास अचानक आग लागण्याची घटना घडली. डिलाइट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या आवारात असलेल्या भंगार आगीत प्लास्टिक रोल, स्क्रॅप पेपर आदीसह तीस हजार रुपयाचे भंगार साहित्य जळून खाक झाले. सदर आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज कंपनी व्यवस्थापनाने वर्तविला आहे. सिडको अग्निशामक व अंबड औद्योगिक वसाहत येथील बंब घटनास्थळी दाखल होते. अग्निशमन दलाचे जवान वाहन चालक नंदू व्यवहारे , प्रमोद लहामगे ,राजू हडस, सुनील शिलावट, रवी आमले, यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.