नाशिक – एलआयसीची आयपीओ द्वारे निर्गुंतवणूक करून खाजगीकरण करण्याचा प्रस्ताव मागे घ्या या प्रमुख मागणीसह कामगार कायद्यातील कामगार विरोधी दुरूस्त्या व शेती विषयक विधेयक मागे घ्या या करीता विमा कर्मचारी संघटना नाशिक तर्फे आज जीवन प्रकाश येथे निदर्शने करण्यात आली.
केंद्र सरकारच्या कामगार, कर्मचारी, नागरीक व शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात अखिल भारतीय स्तरावरील सर्व केंद्रीय संघटना, राज्य संघटना व स्वतंत्र युनियन ह्यांनी केंद्र सरकारच्या कामगार, कर्मचारी, नागरीक व शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात २३ सप्टेंबर हा “निषेध दिन” पाळण्याचा निर्णय घेतला होता. आॅल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉईज अॉॅसोसिएशन तर्फे देशभरातील सर्व युनिट्सना सदर आंदोलन कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.
यावेळी कॉ. मोहन देशपांडे सरचिटणीस यांनी विचार व्यक्त केले. क्लास वन अधिकारी अॉॅसोसिएशनचे जितेंद्र भाटीया, राजेंद्र सोनवणे व नरेंद्र नागराज उपस्थित होते. या प्रसंगी कॉ. सुनील जोशी उपाध्यक्ष, प्रिया मटंगे सहचिटणीस, योगेश कासार सहचिटणीस, अजय डोळस खजिनदार, महेश डांगे सह खजिनदार, अनघा यार्दी महिला आघाडी निमंत्रक व सभासद उपस्थित होते.