नाशिक – विमानात जागा न मिळाल्यामुळे बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणा-या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ओझर विमातळावरुन हैद्राबादला जाणा-या विमानात बॅाम्ब ठेवल्याची अफवा त्याने पसरवली होती. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अफवा पसरवणा-याने कबुली दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून विमानाची तपासणी सुध्दा करण्यात आली. या अफवेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. तर पोलिसांची धावपळ उडाली. विशेष म्हणजे पोलिस नियंत्रण कक्षात फोन करुन ही माहिती अफवा पसरवणा-याने दिली होती.
कोरोनाच्या संकट काळात अगोदरच भीतीचे वातावरण असतांना केवळ सीट न मिळाल्यामुळे अशी अफवा पसरवणे म्हणचे मानसिक विकृतीचा प्रकार आहे. अशा अफवेमुळे तपास यंत्रणेवर येणारा भार व त्यातून निर्माण होणारी भीती किती भयंकर असते. याचा विचारही हे अफवा पसरवणारे करत नसल्याचे एका प्रवाशाने सांगितले.