नाशिक – भारतीय विमानसेवा क्षेत्रात आघाडीवर असलेल्या स्पाईसजेट, अलायन्स एअर आणि ट्रुजेट या तिन्ही कंपन्यांकडून नाशिक विमानसेवेचे जोरदार ब्रँडिंग करण्यात येत आहे. त्यामुळे नाशिकच्या विमानसेवेला मोठा प्रतिसाद मिळण्याची चिन्हे आहेत. उडान योजनेअंतर्गत नाशिकची विमानसेवा सुरू झाली आहे. सद्यस्थितीत अलायन्स एअरची नाशिकहून अहमदाबाद, पुणे आणि हैदराबाद या तीन सेवा सुरू आहेत. तर, ट्रुजेट कंपनीच्यावतीने नाशिकहून अहमदाबाद या सेवा सुरू आहेत. तर, येत्या २० नोव्हेंबरपासून स्पाईसजेट कंपनीकडून नवी दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरू या तीन शहरांसाठीच्या सेवा सुरू होत आहेत. या तिन्ही कंपन्यांकडून सर्व सेवांचे जोरदार मार्केटिंग केले जात आहे. यामुळे आगामी काळात सेवेला मोठा प्रतिसाद मिळण्याची चिन्हे आहेत. त्याचा नाशिकच्या उद्योग, व्यवसाय आणि पर्यटनाला मोठा फायदा होणार आहे.
विमानसेवा कंपन्यांकडून होणारे ब्रँडिंग असे