नाशिक – ओझर येथील विमानतळावरुन सुरु झालेल्या नाशिक विमानसेवेला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढतो आहे. गेल्या जानेवारी महिन्यात आतापर्यंतची सर्वाधिक प्रवासी वाहतूक झाली आहे. ३१ दिवसात सुमारे १७ हजार प्रवाशांनी नाशिक विमानसेवेला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे ही बाब नाशिक विमानसेवेवर शंका उपस्थित करणाऱ्यांना खणखणीत उत्तर आहे.
सद्यस्थितीत नाशिक येथून अहमदाबाद, हैदराबाद, पुणे, बंगळुरू, नवी दिल्ली, बेळगाव या शहरांसाठी सध्या सेवा सुरु आहे. स्पाईसजेट, अलायन्स एअर, ट्रुजेट आणि स्टार एअर या कंपन्यांद्वारे सेवा दिली जात आहे.
विमान प्रवास केलेल्या प्रवाशांची आकडेवारी अशी
असे आहे नाशिक विमानसेवेचे वेळापत्रक