नाशिक – नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक पदावर विभागीय परीक्षा मंडळाचे सचिव नितीन उपासनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाचा अतिरिक्त भार प्रवीण पाटील यांच्याकडे होता. प्रहार संघटनेने या पदावर कायम स्वरुपी या पदावर नियुक्ती व्हावी अशी मागणी केली होती. त्याचप्रमाणे अतिरिक्त कार्यभार असलेल्या प्रवीण पाटील यांच्याविरुध्द त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार सुध्दा केली होती.