नाशिक – नाशिक विभागीय महसूल आयुक्तपदी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी दिले आहे.
गमे यांची नुकतीच नाशिक महानगरपालिका आयुक्तपदावरुन बदली करण्यात आली होती. त्यावेळेस त्यांना कोणतीही पोस्टींग देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांची बदली कुठे होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. महसूल आयुक्त राजाराम माने हे आजच (३१ ऑगस्ट) सेवानिवृत्त झाले. त्याजागी गमे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माने यांचा सेवानिवृत्ती समारंभ होताच गमे यांच्या नियुक्तीचे आदेश आले आहेत. गमे हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. तसेच त्यांना महसूल विभागाचा मोठा अनुभव आहे. उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांच्या महसूल विभागाची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.









