महाराष्ट्र राज्य राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन
परिषदेच्या नाशिक विभागीय उपाध्यक्षपदी निवड
–
येवला – येवला येथील एन्झोकेम हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाचे जेष्ठ प्रा.बाळासाहेब बाबुराव हिरे यांची महाराष्ट्र राज्य राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेच्या नाशिक विभागीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र विषयाची आवड निर्माण व्हावी आणि भविष्यात स्पर्धापरीक्षा देण्यासाठी अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास व्हावा आणि अभ्यासक्रमाबाबत येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी या परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. परिषदेचे प्रा.सुमीत पवार, महासचिव प्रा.पितांबर उरकुडे, कार्याध्यक्ष प्रा.भगवान चौधरी, उपाध्यक्ष प्रा.शरदचंद्र जोगी, राज्य उपाध्यक्ष प्रा.सुरेश नारायणे, सहसचिव प्रा.सुनील राठोड यांनी ही निवड जाहीर केली आहे. प्रा.बाळासाहेब हिरे यांच्या निवडीबद्दल संस्था अध्यक्ष पंकज पारख, उपाध्यक्ष रमेशचंद्रजी पटेल, सेक्रेटरी सुशीलशेठ गुजराथी, सहसेक्रेटरी मनिषभाई गुजराथी व संस्था सदस्य तसेच प्राचार्य किशोर जगताप, उपप्राचार्य प्रा.बिरारी, पर्यवेक्षक प्रा.दत्तकुमार उटवाळे, प्रा.धनवटे, प्रा.आर.बी.गायकवाड, प्रा.अविनाश कुलकर्णी,प्रा.उत्तम पुंड, प्रा.चौधरी, प्रा.एम.पी.गायकवाड, प्रा.विसपुते,प्रा.साळुंखे, प्रा.के.जी.पाटील,प्रा.सुहासिनी शिंदे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.