विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर यांची माहिती
नाशिक : कोरोना संसर्गाच्या काळात शेतकऱ्यांच्या कापसाला हमी भाव मिळण्यासाठी शासनामार्फत नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये आजपर्यंत कोविड कालावधीपूर्वी १ लाख ३ हजार ६३७ शेतकऱ्यांकडून ३१ लाख ४२ हजार २८४ क्विंटल तर कोविड कालावधीनंतर ३३ हजार ७०८ शेतकऱ्यांकडून ८ लाख ८४ हजार १३२ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. याप्रमाणे विभागात एकूण १ लाख ३७ हजार ३४५ शेतकऱ्यांकडून एकूण ४० लाख २६ हजार ४१७ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
नाशिक विभागात आजपर्यंत जळगाव जिल्ह्यात २५ लाख ५५ हजार ६५५ क्विंटल इतकी सर्वाधिक कापूस खरेदी करण्यात आली आहे. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात ५ लाख ०९ हजार ७३४ क्विंटल, धुळे जिल्ह्यात ४ लाख ५० हजार २३ क्विंटल, नंदूरबार जिल्ह्यात ४ लाख ४४ हजार ४१० क्विंटल तर नाशिक जिल्ह्यात ६६ हजार ५९३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असल्याचेही विभागीय सहनिबंध श्रीमती लाठकर यांनी प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे.