नाशिक विभागात १ लाख ८१ हजार ८५५ रुग्णांपैकी १ लाख ५७ हजार ५७३ रुग्ण कोरोनामुक्त;
विभागात २० हजार ६३३ रुग्णांवर उपचार सुरु
नाशिक – नाशिक विभागात आरोग्य विभाग व प्रशासनाचे योग्य नियोजन यामुळे रुग्णबरे होण्याचे प्रमाण देखील दिसून येत असून नाशिक विभागात आज पर्यंत 1 लाख 81 हजार 855 रुग्णांपैकी 1 लाख 57 हजार 573 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, सद्यस्थितीत 20 हजार 633 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत विभागात 3 हजार 649 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. विभागात जरी रूग्ण संख्या वाढत असली तरी रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 86.64 टक्के असून मृत्युदर 2 टक्के इतका आहे. अशी माहिती आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी यांनी दिली आहे.
नाशिक विभागातून आजपर्यंत 5 लाख 41 हजार 797 रुग्णांचे नमुने पाठविण्यात आले असून या नमुन्यांपैकी 1 लाख 81 हजार 855 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच आज विभागात 28 हजार 174 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण होम क्वारंटाईन असून 1 हजार 939 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईन असल्याची माहिती उपसंचालक डॉ. मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी यांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 87.95 टक्के:
नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत 73 हजार 888 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 64 हजार 981 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 7 हजार 571 रुग्णांवर उपचार सुर
असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.95 टक्के इतके आहे. आजपर्यंत 1 हजार 336 रुग्णांचा मृत्यु झाला
आहे.
जळगांव जिल्ह्यात आजपर्यंत 38 हजार 753 रुग्णांना डिस्चार्ज:
जळगांव जिल्ह्यात आजपर्यंत 47 हजार 648 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 38 हजार 753 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 7 हजार 729 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.33 टक्के इतका आहे. आजपर्यंत 1 हजार 166 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
धुळे जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 90.60 टक्के:
धुळे जिल्ह्यात आजपर्यंत 12 हजार 208 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 11 हजार 061 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 786 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.60 टक्के इतके आहे. आजपर्यंत 361 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात 3 हजार 704 रुग्णांवर उपचार सुरु
अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत 42 हजार 693 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 38 हजार 320 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 3 हजार 704 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.75 टक्के इतका आहे. आजपर्यंत 669 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात 843 रुग्णांवर उपचार सुरु
नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत 5 हजार 418 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 4 हजार 458 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 843 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.28 टक्के इतके आहे. आजपर्यंत 117 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.