शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक विभागातील पर्यटन स्थळांचा संपूर्ण विकास करावा – राज्यमंत्री आदिती तटकरे

by Gautam Sancheti
डिसेंबर 21, 2020 | 1:53 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20201221 WA0004

नाशिक – नाशिक विभागातील पर्यटनस्थळांचा एमटीडीसीच्या माध्यमातून संपूर्ण विकास करून त्यात पर्यटकांना सर्वोत्तम सुविधा पुरविण्यावर भर देण्यात यावा आणि ती पर्यटनस्थळे लवकरात लवकर पर्यटकांच्या सेवेत आणावित, अशा सूचना पर्यटन, माहिती व जनसंपर्क व राजशिष्टाचार राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या आहेत.
आज नाशिक येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ग्रेप रिसॉर्ट येथे आढावा बैठकीत राज्यमंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आषुतोष सलिल, प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, पर्यटन विभागाचे कार्यकारी अभियंता विनय वावधनी, स्थापत्य अभियंता महेश बागुल, विद्युत विभागाचे अभियंता सतीश चुडे, कनिष्ठ अभियंता रोहित अहिरे, कुलदिप संख्ये आदी उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, शिर्डी येथील एमटीडीसीच्या पर्यटक निवासामध्ये पर्यटकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार माफक दरात सोयी, सुविधा पुरविण्यासाठी नियोजन करण्यात यावे. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासांचा पर्यटक अधिक प्रमाणात लाभ घेवू शकतील. तसेच नाशिक येथील गंगापूर कन्वेन्शन केंद्र, कलाग्राम केंद्र, यासोबतच नंदूरबार जिल्ह्यातील संगमेश्वर, केदारेश्वर मंदिर परिसर आदी पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी प्राप्त झालेल्या निधीच्या माध्यमातून तेथील कामांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार कामे पूर्ण करण्यात यावीत. विभागातील सर्व पर्यटन स्थळांचा विकास करत असतांना कालबध्द कार्यक्रम निश्चित करून प्रकल्प शंभर टक्के पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. कुठलेही काम अपूर्ण अवस्थेत ठेवू नये अथवा अंशत: पूर्ण करू नये, असेही  राज्यमंत्री आदिती  तटकरे यांनी यावेळी सांगितले आहे.
बैठकीनंतर राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी  ग्रेप पार्क रिसोर्टची पाहणी करून गंगापूर येथील बोट क्लब प्रकल्पास देखील भेट दिली. तसेच राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी बोटींगचे पहिले तिकीट काढून बोटींग पर्यटनाच्या पहिल्या  मानकरी ठरल्या. याप्रसंगी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तर पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा सिंह नायर ह्या प्रत्यक्ष उपस्थित होत्या.
द एस.एस.के. वर्ल्ड क्लबला भेट
बैठकीपूर्वी नाशिक येथील पाथर्डी शिवारातील सर्व क्रीडा सुविधांनी युक्त द एस.एस.के. वर्ल्ड क्लबची उद्योग आणि खनिकर्म, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदीती तटकरे यांनी पाहणी केली. पाहणी दरम्यान, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, माजी आमदार जयंत जाधव, द एस.एस.के. वर्ल्ड क्लबचे संचालक शैलेश कुटे व डॉ. राजश्री कुटे आदी उपस्थित होते. सहा एकर मध्ये तयार करण्यात आलेल्या या क्लबमध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस व बास्केटबॉल कोर्ट, मिनी थिएटर, स्वीमिंगपूल, कॅरम, चेस, रायफल शुटिंग, कार्ड्स व स्नुकर रूम आदी क्रीडा सुविधांची राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी माहिती घेतली. ३५ एकर जागेपैकी ६ एकर जागेत एस.एस.के.स्पोर्ट्स क्लब तयार करण्यात आले आहे. एस.एस.के.स्पोर्ट्स क्लबचे आजपर्यंत जवळपास चारशे सभासद असल्याची माहिती क्लबचे संचालक कुटे यांनी यावेळी दिली.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक कोरोना अपडेट- ३४७ कोरोनामुक्त. ३५३ नवे बाधित. ८ मृत्यू

Next Post

अभाविप नाशिक महानगर अध्यक्षपदी प्रा. नरेंद्र देशमुख व महानगर मंत्री सिद्धेश खैरनार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20201221 WA0028

अभाविप नाशिक महानगर अध्यक्षपदी प्रा. नरेंद्र देशमुख व महानगर मंत्री सिद्धेश खैरनार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

GxzEy8PW4AAqB 7

आरे आरे आरे, काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे…खा. नरेश म्हस्के यांचे हे ट्वीट चर्चेत

ऑगस्ट 8, 2025
rohit pawar

या वादग्रस्त नेत्यांचे पहिले राजीनामे घ्या..!…आमदार रोहित पवार यांनी केली मागणी

ऑगस्ट 8, 2025
crime11

वाहतूक दंडाच्या नावाने सायबर भामट्यांनी अनेकांचे बँक खाते केले रिकामे…आयटीअ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल

ऑगस्ट 8, 2025
modi 111

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात दूरध्वनीवरून संवाद…ही झाली चर्चा

ऑगस्ट 8, 2025
note

ठेवीदारांना मिळणार दिलासा…पैसे परत मिळवून देण्याची कार्यवाही गतीने करण्याचे गृह राज्यमंत्र्यांनी दिले निर्देश

ऑगस्ट 8, 2025
सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार 2 1024x682 1

सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार…

ऑगस्ट 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011