व्यवस्थापकाकडून कामगार महिलेचा विनयभंग
नाशिक : दहा दिवसांचा पगार घेण्यासाठी गेलेल्या महिला कामगाराचा कारखाना व्यवस्थापकासह एकाने विनयभंग केल्याची घटना औद्योगीक वसाहतीत घडली. याप्रकरणी अंबंड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पंकज लोचन (रा.कामटवाडा) आणि विजू गायकवाड (रा.विल्होळी) अशी कामगार महिलेचा विनयभंग करणा-या संशयीतांची नावे असून लोचन हा कंपनी व्यवस्थापक आहे. पाडित महिला औद्योगीक वसाहतीतील प्लॉट नं. १०३ मध्ये असलेल्या सांबे इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीत कामास होती. या काळात संशयीत व्यवस्थापक तिच्याकडे मोबाईल नंबरची मागणी करीत असे तसेच कामगारांची सुट्टी झाल्यानंतर तिला मुद्दाम थांबवून अंगलट करण्याचा प्रयत्न करायचा. मात्र महिलेने त्यास चांगलेच खडसावल्याने त्याने महिलेस कामावरून कमी केले होते. सोमवारी (दि.९) दुपारच्या सुमारास पीडित महिला लॉकडाऊन पूर्वींचा दहा दिवसांचे वेतन घेण्यासाठी कंपनीत गेली असता ही घटना घडली. व्यवस्थापकासह विजू गायकवाड नामक इसमाने तिच्याशी अश्लिल संभाषण करून विनयभंग केला. यावेळी दोघांनी पगार देण्यास नकार देवून महिलेस कारखान्याबाहेर काढले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे करीत आहेत.
….…
विवाहीतेचा विनयभंग
नाशिक : घरात शिरून एकाने विवाहीतेचा विनयभंग केल्याची घटना पाथर्डीफाटा भागात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परेश मधुकर गांगुर्डे (रा.दामोदर नगर) असे संशयीताचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयीत हा पीडित महिलेच्या सासूचा मानलेला भाऊ असून त्याचे पीडितेच्या घरी येणे जाणे आहे. २३ आॅक्टोबर रोजी पीडिता घरात एकटी असल्याची संधी साधून संशयीताने महिलेचा विनयभंग केला. अधिक तपास हवालदार खांडेकर करीत आहेत.
….…
अल्पवयीन मुलीचा विनयभंग एकास अटक
नाशिक : बिस्कीटचे आमिष दाखवून घरात शिरलेल्या ५० वर्षीय इसमाने ९ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना वजे्रश्वरी झोपडपट्टीत घडली. संशयीत दिंडोरीरोडवरील एका हॉटेलमध्ये किचन सुपरवायझर म्हणून कामास असून त्याच हॉटेलमध्ये काम करणा-या मजूर महिलेच्या घरी जावून त्याने हे कृत्य केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधीत कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी संशयीतास बेड्या ठोकल्या आहेत.बबलू छाबरा (रा.दिंडोरीरोड) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. संशयीत ज्या हॉटेल मध्ये काम करतो त्याच हॉटेलमध्ये पीडित मुलीची आई काम करते. त्यामुळे संशयीताचे तिच्या घरी जाणे होते. सोमवारी (दि.९) संशयीताने महिलेचे घर गाठून घरात कुणी नसल्याची संधी साधत हे कृत्य केले. मुलीस बिस्कीट आणि पापड्यांचे आमिष दाखवून त्याने लैंगिक शोषण करीत तिचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक डी.एस.पाटील करीत आहेत.