नाशिक – महावितरणच्या नाशिक परिमंडळ कार्यालयातील विद्युत भवन येथे आज शनिवार ३० जानेवारी रोजी हुतात्मा दिनी दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. नाशिक परिमंडळाचे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, जनसंपर्क अधिकारी विकास आढे, सहाय्यक विधी अधिकारी प्रशांत लहाने, उपव्यवस्थापक गजानन पोलादे व गुलाबराव पवार यांच्यासह कर्मचारी यांनी दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांचे स्मरण केले.