नाशिक : वाढीव वीज बिलांविरोधात मनसेने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केले. मनसेचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रदीप पवार, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी व दिलीप दत्तु दातीर व शहराध्यक्ष अंकुशभाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मनसेचे राजगड कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय हा मोर्चा निघाला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. भजन व किर्तन म्हणत हे आंदोलन करण्यात आल्यामुळे या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले.
या मोर्चात मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक सलिममामा शेख व योगेशभाऊ शेवरे, नगरसेविका नंदिनीताई बोडके, वैशालीताई भोसले, उपजिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील, सुरेश घुगे, मनोज ढिकले, संतोष सहाणे, रमेश खांडबहाले, संदीप किर्वे, संतोष पिल्ले, नितीन साळवे, सत्यम खंडाळे, भाऊसाहेब निमसे, विक्रम कदम, रामदास तात्या दातीर, प्रकाश दादा निगळ, विजय आहिरे, मिलिंद कांबळे, सचिन भोसले, अविनाश पाटील, सुनील गायधनी, शैलेश शेलार, सतीश विसपुते, प्रकाश शिंदे, प्रकाश गोसावी, नवनाथ कोठुळे, अॅड. दिलीप केदारे, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.