नाशिक : आगामी सणोत्सवाच्या पार्श्वभूमिवर शहर पोलीसांनी पुन्हा एकदा तडिपारीचे अस्त्र हाती घेतले असून, वडाळागाव भागात राहणा-या तीघा सराईतांना तडीपार केले आहे. ही कारवाई परिमंडळ २ चे उपायुक्त विजय खरात यांनी केली आहे.
मुजाहिद उर्फ गोल्डी अफजल खान ( रा,राजवाडा,वडाळागाव),अकील लतीफ शेख (रा.गणेशनगर,वडाळागाव) व मनोज महादेव शेंगडे (रा.म्हाडा वसाहत,वडाळागाव) अशी तडीपार करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. संशयीतां विरूध्द इंदिरानगरसह विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाच्या गुह्यांची नोंद आहे. संशयीतांनी सवलत देवूनही वर्तनात बदल न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. शहरात वारंवार गुन्हे करणारे गुन्हेगारांना पोलीसांनी रडारवर घेतले असून नागरीकांच्या जिवीताचे व मालमत्तेचे संरक्षण व्हावे या उद्देशाने ही कारवाई करण्यात येत आहे. आगामी सणोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी गुन्हेगारांसह त्याच्या समर्थकांवर तसेच बेकायदेशीर मदत करणा-यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असून नागरीकांनी साध्या वेशातील पोलीसाची भूमिका बजवावी असे आवाहन करण्यात आले आहे.