नाशिक – वंजारी सेवा संघ उत्तर महाराष्ट्राच्या वतीने सातपूर येथील सिटू भवन नाशिक येथे संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. संत भगवान बाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करत प्रसादाचे वाटप करून अभिवादन करण्यात आले. तानाजी जायभावे व मंजुषा दराडे यांनी मनोगत व्यक्त केले.
शिवाजी बडे यांनी “सत्याच्या मार्गावर चालण्याची भगवान बाबांची शिकवण जोपासूया”हा संकल्प सर्वांनी करावा असे आवाहन करून “संत भगवान बाबा” यांची जयंती व पुण्यतिथी शासकीय कार्यालयात साजरी करण्याबाबत शासन निर्णयामध्ये तरतूद करण्याची मागणी करत त्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी बडे यांनी केले होते.
कार्यक्रमास माजी नगरसेवक तानाजी जायभावे, वंजारी सेवा संघ महिला आघाडीच्या राज्याध्यक्षा मंजुषाताई दराडे,वंजारी सेवा संघ उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शिवाजी बडे,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्याचे असिस्टंट डायरेक्टर बबन विरणक,आय.टी.आय.नाशिकचे ट्रेंनिग ऑफिसर नितीन तांदळे,रविंद्र घाटोळ,आय.टी.आय.नाशिकचे वसतिगृह अधीक्षक दिगंबर डोंगरे,आय.टी.आय.नाशिकच्या क्लार्क ज्योती बडे,आय.टी.आय.नाशिकचे कर्मचारी कृष्णा वाघ,शिवाजी धात्रक,संजय हेंबाडे आदींसह वंजारी समाजाचे बांधव उपस्थित होते.