नाशिक – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मार्फत आयोजीत राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जिह्यातील ३ हजार ९४४ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. प्रलंबित आणि दावा दाखल पूर्व प्रकरणांमध्ये सुमारे २५ कोटी ८९ लाख ७० हजार २९७ रूपयांची तडजोडी करण्यात आली.
राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशान्वये शनिवारी (दि.१२) राष्ट्रीय लोक अदालत पार पडली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोव्हीड – १९ च्या पार्श्वभूमिवर सर्व नियमांचे पालन करून तसेच सुरक्षीततेची काळजी घेवून तालूका पातळीवर तसेच जिल्हान्यायालय आवारात राष्ट्रीय लोकअदालतीचे नियोजन केले होते. या लोकअदालमध्ये जिल्हाभरातील २० हजार २४६ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यात प्रलंबीत आणि दावा दाखल पूर्व प्रकरणांचा समावेश होता. न्यायालयात प्रलंबीत असलेल्या प्रकरणांपैकी कलम १३८ ची ९२६,फौजदारी ३८७, बँकेची ७१, मोटार अपघात १४७, कामगार विषयक ४, कौटूंबिक ८८,भूसंपादन सहा आणि दिवाणी दावे १०१ अशी १ हजार ७३० प्रकरणी निकाली निघाली. तर दावा दाखल पूर्व प्रकरणातील २ हजार २१४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. प्रलंबीत आणि दावादाखल अश्या ३ हजार ९४४ प्रकरणांचा या लोकन्यायालयात निपटारा लावण्यात आला असून यात २५ कोटी ८९ लाख ७० हजार २९७ रूपयांची तडजोडी करण्यात आली. या लोकअदालतीत जिह्यातील न्यायीक अधिकारी, वकिल आणि पक्षकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
…