नाशिक – लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या ॲाक्टोबर सेवा सप्ताह निमीत्त नाशिकमधील सहा क्लबने एकत्र येवुन झोन चेअरमन प्रविण जयकृष्णीया यांचे नेतृत्वात रक्तदान शिबीराचे आयोजन पंडित कॉलणी मधील लायन्स हाॅल येथे केले होते.या ५५ जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उदघाटन उपप्रांतपाल राजेश कोठावदे यांचे हस्ते झाले. यावेळेस लायन्स क्लब काॅर्पोरेटचे अध्यक्ष रमेश पवार, नाशिक राॅयल्सचे अध्यक्ष राहुल वेढणे, नाशिकचे अध्यक्ष रमेश गायकवाड, सुप्रिमचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, सेंट्रलचे अध्यक्ष अमोल सोनजे, गोदावरीचे अध्यक्ष ललित जोशी यांचेसह कॅबीनेट ॲाफीसर्स शेखर सोनवणे, बापु निकुंभ, बी बी पाटील, उषा तिवारी, अभय चोकसी, सागर तळेकर, मनिष अहिरे, के डी पाटील, सचिन शाह, महेश तिवारी,सतिष कोठारी, आबासाहेब गिते, सी आर आव्हाड, समिर दुसाणे, श्रीकांत पाटील, विनय बिरारी, खेतसी पटेल, रमिलाबेन पटेल, योगेश नेरकर, जे. बी.सांगळे, उमेश भदाणे, हरिष कुंभारे, विजय वानखेडे, विशाल गांधी. भुषण कोठावदे, बाळासाहेब सोनवणे, किशोर शिरसाठ, रूपाली जोशी, गौरी तळेकर व कारभारी धात्रक यांच्यासह अर्पण रक्तपेढीचे डाॅ. जैन हे उपस्थितीत होते.
यावेळेस उपप्रांतपाल राजेश कोठावदे यांनी मनोगत व्यक्त करतांना लायन्स सेवासप्ताहाच्या तिस-या दिवशी सहा क्लब एकत्र येवून आजची समाजाची गरज ओळखुन रक्तदान शिबीराचे आयोजन करतात, हे खरोखरच कौतुकास्पद असुन झोन चेअरमन व सहाही क्लबच्या पीएसटीचे कौतुक केले. यावेळेस सर्व सहाही अध्यक्षांनी व उपस्थित कॅबीनेट ॲाफीसर्स नी आपले मनोगत व्यक्त करुन समाधान व्यक्त केले
झोन चेअरमन प्रविण जयकृष्णीया यांनी सर्व सहाही अध्यक्षांनी या रक्तदान शिबीर आयोजनात साथ दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ७ ॲाक्टाे रोजी मेंबर्स ओरीएंटेशन व क्लब क्वालीटी इनिशीएटीव्ह सेमिनारसाठी नाशिकमधील सर्व क्लब मेंबर्सनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले..