नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन युवतीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. हा प्रकार लॉकडाऊन काळात घडला. सर्वत्र संचारबंदी असतांना संशयीताने मुलीस नजीकच्या झोपडपट्टीतील एका पडक्या घरात नेवून हे कृत्य केले. मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात बलात्कार आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेश पंडित (रा.राणाप्रताप चौक) असे संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजी चौकात राहणा-या १६ वर्षीय युवतीने तक्रार दाखल केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात लॉकडाऊन सुरू असतांना मुलीची संशयीताशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्याने संशयीताने सर्वत्र संचारबंदी असतांना नजीकच्या लेखानगर झोपडपट्टीतील एका पडक्या घरात नेले. या ठिकाणी त्याने बलात्कार केला. हा प्रकार डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होता. या काळात मुलीस गर्भधारणा झाल्याने हा प्रकार समोर आला असून अधिक तपास उपनिरीक्ष सविता गवांदे करीत आहेत.
….
पळवून नेवून तरूणीवर बलात्कार
नाशिक : सोशल मिडीयावर झालेल्या ओळखीतून सातारा येथील युवकाने तरूणीस पळवून नेत बलात्कार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या घटनेत संशयीताने वेगवेगळया ठिकाणी घेवून जात लग्नाच्या बहाण्याने तरूणीचे दागिणे बळजबरीने काढून घेतले असून, पोलीसांनी संशयीतास अटक केली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात वेगवेगळया कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव लक्ष्मण पाटील (३० रा.सातारा) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी पाथर्डी फाटा येथील ज्ञानेश्वरनगर भागात राहणा-या तरूणीने तक्रार दाखल केली आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून तरूणीची संशयीताशी ओळख झाली. ७ डिसेंबर रोजी संशयीताने नाशिक गाठून तरूणीशी संपर्क केला. यावेळी त्याने बोलावून घेत तरूणीस एमएच १४ सीएक्स २५९५ या झायलो कार मधून पळवून नेले. लग्नाचे आमिष दाखवून संशयीताने तरूणीस आपल्या वाहनात बसवून मोबाईल स्विच आॅफ केला. त्यानंतर मुरबाड ता.कल्याण येथील भरत वाळींबे नामक मित्राच्या घरी नेले. या ठिकाणी बळजबरीने शारिरीक संबध ठेवले. या काळात त्याने विवाह खर्चासाठी तरूणीच्या अंगावरील दिड तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे बळजबरीने काढून घेतले. तसेच रजिस्टर लग्न करीत असल्याचे भासवून नोटरी करून लग्न झाल्याचे सांगितले. त्यानंतर कारागृहात असलेल्या दिगंबर चंदे या मित्राच्या घरात डांबून ठेवत बलात्कार केल्याचा आरोप तरूणीने केला आहे. दरम्यान संशयीताविरूध्द याच प्रकारचे दोन गुन्हे दाखल असून त्याने रबाले आणि सातारा पोलीस ठाणे हद्दीत राहणा-या तरूणींना पळवून नेत बलात्कार केल्याचे समोर आले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सुहासिनी बारेला करीत आहेत.