नाशिक : रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविले जातात. सामाजिक बांधिलकी बरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव आणि व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘रोटरॅक्ट युथ फेस्ट’ अंतर्गत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांत निरनिराळ्या सांस्कृतिक स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. या उपक्रमात शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून आपले कलाविष्कार सादर केले.
रोटरी क्लब ऑफ नाशिकने खास शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यातील नेतृत्त्व गुण विकसित व्हावेत, त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा आणि हक्काचे व्यासपीठ मिळवून देता यावे यासाठी बहुतांश महाविद्यालयांत रोटरॅक्ट क्लब स्थापन केले आहेत. रोटरॅक्ट क्लबच्या अंतर्गत नृत्य, गायन आणि एकांकिका या तीन कलाप्रकारांत स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धात नागपूर, मालेगाव, सटाणा, इगतपुरी, चाळीसगाव, शेगाव, नाशिक, मनमाड आदी शहरातील सुमारे १२० हून अधिक रोटरॅक्टनी झूम अँपच्या माध्यमातून सहभाग नोंदवला.
या युथ फेस्टचा पारितोषिक वितरण समारंभ रोटरीचे माजी प्रांतपाल महेश मोकलकर, रोटरॅक्टचे जिल्हाध्यक्ष अभिषेक गोयल यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना महेश मोकलकर यांनी कलागुणांना वाव भेटण्यासाठी त्यावर मेहनत घेतली तर आपले जीवन आनंदीदायी होण्यास मदत होईल असे सांगितले. गोयल यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
युथ फेस्टमध्ये झालेल्या कलाविष्कारांचा निकाल पुढीलप्रमाणे – नृत्य – प्रकारात आसावरी उमाटे, ऋचा वैद्य, अनन्या निशीत, रश्मी सोनार, निकिता पवार, सिद्धेश बोरसे, गायन – पूजा सोनवणे, निलेश जाधव,आर्या तांबोळी, निकिता रेदासनी, वैष्णवी ठाकरे, तनिक्षा यादव, एकांकिका – ऋचा वैद्य, मनाली पांडव, साहिल फडके यांनी विजेतेपद पटकावले. नाशिक ते गोंदिया या संपूर्ण रोटरी डिस्ट्रिक्ट असलेल्या क्लबच्या सदस्यांकरिता आयोजित स्पर्धेचे आयोजन रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्षा मुग्धा लेले, सचिव विजय दिनानी, प्रफुल बरडीया यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. समन्वयक शिल्पा पारख यांनी सूत्रसंचालन केले. सचिव प्रफुल बरडिया यांनी आभार मानले. या युथ फेस्टसाठी रोटरीचे सर्व संचालक, निशिगंधा उपासनी, ऋचा वैद्य, निलेश चौधरी, आशिष निकम, दिनेश बच्छाव, साहिल फडके, लिना शॉ, भावेश अमृते, प्राजक्ता जोशी, अनंत जोशी, साक्षी पारख यांनी विशेष घेतले.