शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – रोटरी क्लबने भागवली दरेवाडी ग्रामस्थांची पाण्याची तहान

by India Darpan
एप्रिल 19, 2021 | 11:41 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210411 WA0006 1

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील घोटी जवळील दरेवाडी एक छोटंसं आदिवासी खेडं. कालांतराने भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या दरेवाडीच्या गावकऱ्यांना गावात धरणासाठी त्यागही केला. मात्र माणसं आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची उपेक्षा वर्षानुवर्षे संपेना. घशाची तहान भागविण्यासाठी येथील महिलांना मैलोनमैल पायपीट करावी लागायची. अलीकडेच दरेवाडीच्या या पाणी प्रश्नाची दखल रोटरी क्लब ऑफ नाशिकने घेतली आणि भाम धरणातून पाणी उपसा करणारे नादुरुस्त पंप दुरुस्तीचे काम करून येथील गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवली. गावात पाणी आल्याने येथील गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दरेवाडी येथील शिक्षक किशोर चित्ते यांच्या माध्यमातून गावकऱ्यांनी वर्षानुवर्षे पाण्यासाठी होणारी वणवण सांगताच रोटरी क्लबच्या अध्यक्षा मुग्धा लेले यांनी हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी संचालक मंडळाची ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत पंप दुरुस्ती कामासाठी आर्थिक खर्चास मंजुरी घेतली आणि हा प्रश्न मार्गी लावला. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून या गावात रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. विविध शैक्षणिक साहित्य, संगणक , क्रीडा साहित्य इत्यादी वस्तूंचे निकडीनुसार वाटप करण्यात आले आहे. गेल्याच वर्षी या परिसरातील आदिवासी मुलींसाठी सायकलींचे वाटप करण्यात आले. या गावाच्या ग्रामविकासासाठी रोटरी सभासद सातत्याने या गावाला भेटी देत असतात. पुढीलवर्षी या गावात संपूर्ण ग्राम विकास अभियान राबविण्यात येणार असल्याचे रोटरी क्लब ऑफ नाशिकचे कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर हेमराज राजपूत आणि ओमप्रकाश रावत यांनी सांगितले. रोटरीतर्फे राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांत येथील गावकरी हिरीरीने सहभागी होत असतात.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

Whatsapp मध्ये आल्या या सुविधा; त्वरित करा अपडेट

Next Post

लासलगाव येथे मोफत कोविड तपासणी व आरोग्य शिबिरास प्रारंभ

Next Post
IMG 20210419 WA0021

लासलगाव येथे मोफत कोविड तपासणी व आरोग्य शिबिरास प्रारंभ

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cm dharangaon 1024x684 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

जून 20, 2025
Untitled 68

लोकलमध्ये महिलांची हाणामारी, बघा, सोशल मीडियामधील व्हायरल व्हिडिओ

जून 20, 2025
jilha parishad

एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात नाशिक झेडपीत फसवणुकीचा गुन्हा

जून 20, 2025
DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

जून 20, 2025
Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011