नाशिक – कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शहरात रेमडेसिवर इंजेक्शनचा मागणी वाढली असून त्यामुळे तुटवडा सुध्दा जाणवू लागला आहे. मंगळवारी अनेक मेडिकल दुकानासमोर रुग्णांच्या नातेवाईकाच्या रांगा दिसत होत्या. रेमडेसिवर इंजेक्शनचा पुरवठा करणा-या उत्पादक कंपन्या मागणी प्रमाणे पुरवठा करत नसल्यामुळे हा तुटवडा जाणवत आहे. बंगलोर व हैद्राबाद येथील कंपन्यातून या इंजेक्शनचा पुरवठा केला जातो. या कंपन्या अगोदर आपल्या स्टॅाक्टीस्टकडे नागपूरला हे इंजेक्शन पाठवतात. त्यानंतर ते मुंबईला येते व नंतर नाशिकला ते पाठवले जाते. त्यामुळे त्यात तीन दिवस वेळ जातो. या इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये म्हणून प्रशासन काळजी घेत आहे.