नाशिक : रिक्षा प्रवासात महिलेच्या पिशवीतील लाखाचे मंगळसुत्र भामट्या सहप्रवाश्याने लांबविल्याची घटना रविवार कारंजा भागात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उज्वला यशवंत शिरसाठ (रा.महात्मा फुले नगर,पेठरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शिरसाठ या गुरूवारी (दि.५) दिवाळी खरेदीसाठी रविवार कारंजा भागात आल्या होत्या. काम आटोपून त्या आपल्या घराकडे परतण्यासाठी प्रवासी वाहतूक करणा-या रिक्षात बसल्या असता ही घटना घडली. सहप्रवासी असलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतील ९० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र हातोहात लांबविले. ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास हवालदार कोल्हे करीत आहेत.
…..
पादचारीच्या गळयातील सोनसाखळी खेचली
नाशिक : रस्त्याने पायी जाणा-या इसमाच्या गळयातील सोनसाखळी दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना सिडकोतील लेखानगर भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन दादासाहेब पाटील (रा.युग मंदिर सोसा.लेखानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पाटील बुधवारी (दि.४) रात्री लेखानगरकडून स्टेट बँक चौकाकडे पायी जात असतांना ही घटना घडली. सोमानी हॉस्पिटल समोर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या एकाने त्यांच्या मानेवर थाप मारून सुमारे १५ हजार रूपये किमतीची सोनसाखळी खेचून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.