नाशिक – राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात दिवाळी निमित्त महिला पदाधिकारी यांनी आपल्या भागातील सर्व सामान्य गोर गरीब गरजू महिलांना एक पणती– एक साडी भेट देण्याचा उपक्रम राबविला. काही महिला पदाधिकारींनी गरीब मुलांना नविन कपडे देखील खरेदी केले. शहरात प्रदुषण मुक्त दिवाळी साठी महिलांनी आपल्या मुलांना फटाके फोडण्या पासून परावृत्त केले.
हातात घेऊनी हात,करू कोरोना वर मात,दिवाळीची वाढवू गोडी,गरजू महिलेला देऊ साडी. हा संदेश दिवाळी निमित्त समाजाला देण्याचा छोटासा प्रयत्न महिलांनी केला. या सामाजिक उपक्रमात राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्षा अनिता भामरे, पश्चिम विधानसभा अध्यक्ष पुष्पा राठोड, मध्य विधानसभा अध्यक्ष रंजना गांगुर्डे, पूर्व विभागीय अध्यक्ष सलमा शेख, पंचवटी विभागीय अध्यक्ष सरिता पगारे, नासिक रोड विभागीय अध्यक्ष रूपाली पठारे, शाकेरा शेख, सातपूर विभागीय अध्यक्ष अपेक्षा अहिरे, शहर उपाध्यक्ष मिनाक्षी गायकवाड, वैशाली ठाकरे, अर्चना कोथमिरे, चिटणीस पुनम शहा, संघटक शाहिन शेख, शकिला शेख, सुनिता थिगळे, कौसर काझी, मिनाक्षी घोडके यासह आदि महिलांनी सहभाग घेतला.