नाशिक – गोदावरी नदी पात्रात जिवंत जलस्त्रोतच्या शोध घेण्याकरिता रामकुंड जवळ (अहिल्यादेवी कुंड) नाशिक स्मार्ट सिटी तर्फे सोमवारी सायंकाळी ट्रायल बोअर घेण्यात आले. त्यात १.५ इंचाचे पाणी लागल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी यांनी दिली. ” नाशिक स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत ट्रायल बोअर घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर या बोअरवेल खोदण्याचे काम सुरु झाले. त्यात या ६० फुटाच्या ट्रायल बोअरलाच १.५ इंची पाणी लागले. गोदावरी नदी पात्रात जिवंत जलस्रोत सुस्थितीत असल्याचे यामुळे स्पष्ट झाल्याचेही जानी यांनी सांगितले. आता स्मार्ट सिटीच्या बैठकीत झालेल्या ठरावनुसार क्षणाचा विलंब न रामकुंडसहित उर्वरित १२ कुंडांचे सिमेंट-कॉक्रीट तात्काळ काढावे अशी मागणी जानी यांनी सांगितले.