नाशिक – कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असताना राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या दुहेरी संकटाला सामोरे जाण्यासाठी पालकमंत्री छगनराव भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरात कोरोना विषयी सर्व नियम पाळत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावाला आळा घालण्यासाठी शासन स्तरावरूनही प्रयत्न सुरू आहेत. तसेच रुग्णालयातही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. तसेच काही कोरोना रुग्ण गंभीर असून, त्यांना मोठ्या प्रमाणात रक्ताचीही गरज लागतेय. कोरोना रुग्ण संख्या पाहता आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रक्ताची गरज वाढली असून, रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने गंगापूर रोड परिसर व जुने नाशिक परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सुरक्षित अंतर ठेवत जास्त गर्दी न करता स्वच्छता करत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. रक्तदात्यांची काळजी घेत व संपूर्ण आजाराची विचारपूस करत योग्य चाचणी करून त्यांचे रक्त संकलित करण्यात आले. विविध शस्त्रक्रिया व आजारांच्या उपचाराकरिता रक्ताची आवश्यकता भासते. कोरोना विषाणू मुळे रक्तदाते कमी झाले असून नियमित चालणाऱ्या रक्तदान शिबिरांना फटका बसला आहे. मोठमोठे उद्योजक आपल्या कंपनीमध्ये कर्मचारी वर्गात रक्तदान शिबिराचे आयोजन करत असतात परंतु कोरोनामुळे सर्व उद्योगधंदे बंद असल्याने कर्मचारी वर्गही रक्तदान करत नाही. कोरोनाच्या संकटामुळे रक्तदाते रक्तदान करत नसल्याने रक्ताचा मोठा तुटवडा भासत आहे. हा तुटवडा कमी करण्यासाठीच या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये व सुरक्षित अंतर राहावे याकरिता गंगापूर रोड परिसरात मध्य विधानसभा अध्यक्ष किशोर शिरसाठ यांनी तर जुने नाशिक परिसरात शहर सरचिटणीस संजय खैरनार व मुजाहिद शेख यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. डिसेंबर महिन्यातही अशाच प्रकारे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. तेव्हाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
यावेळी कुणाल बोरसे, असिफ जानोरीकर, सलीमराज शेख, सागर ठाकरे, शरीफ बाबा शेख, भुवनेश कडलग, सागर बेदरकर, बापू शिंदे, नदीम शेख, दिपक माटल, फारुख शेख, हेमंत चौरे, अकिल खान, ओमकार महाले, चेतन देशमुख आदि पदाधिकारी उपस्थित होते.