नाशिक – नुकतेच जिल्हा प्रशासनाच्यावतीने नाशिक जिल्ह्यात शनिवार व रविवार लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. पण नाभिक समाजाचा व्यवसाय अन्य दिवसांच्या तुलनेत फक्त रविवारी जास्त प्रमाणात असल्यामुळे रविवारी सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय सुरु ठेवणे बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नाभिक युवा सेना व नाशिक जिल्हा सलून चालक-मालक संघटनेतर्फे देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, सामाजिक रूढी परंपरा प्रमाणे इतर दिवसाच्या तुलनेत लोक रविवारी केस कापण्यास प्राधन्य देतात. मात्र याच दिवशी रविवारी लॉकडाऊन जाहीर झाल्याने सलून व ब्युटी पार्लर व्यावसायिकांचे मोठे नुकसान होणार आहे. यापूर्वी सुध्दा सहा-सात महिन्यांपर्यंत सलून बंद राहिल्याने कारागिरांचे आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. आता पुन्हा सर्वाधिक व्यवसाय होणाऱ्या दिवशीच लॉकडाऊन असल्याने पुन्हा एकदा आर्थिक नुकसानीचा सामना सलून व्यावसायिकांना करावा लागणार आहे.अगोदरच हातावर असलेल्या नाभिक समाज अधिक अडचणीत येऊ शकतो. म्हणून सर्व अटी-शतींसह रविवारी सलून व पार्लर व्यवसाय सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी.
या निवेदनावर नारायणराव यादव विशेष निमंत्रित सदस्य, अशोक आप्पा सुर्यवंशी प्रदेश उपाध्यक्ष, सौ. संगीता (पल्लवी) मगर, महा.प्रमुख महिला आघाडी, नाशिक शहर, अरुण सैंदाणे विभागीय कार्याध्यक्ष उ. महा., श्री. गणेश जाधव जिल्हाध्यक्ष युवासेना, राजेंद्र कोरडे कार्याध्यक्ष नाशिक शहर, सुरेश सुर्यवंशी जिल्हाध्यक्ष, संजय गायकवाड विभागीय अध्यक्ष उ. महा., श्री. नाना वाघ महानगरप्रमुख नाशिक शहर, सौ. वैशाली सैंदाणी जिल्हा संपर्क प्रमुख, श्री. रमेश आहेर जिल्हा कार्याध्यक्ष, श्री. संतोष वाघ जिल्हा संपर्क प्रमुख, ज्ञानेश्वर बोराडे शहराध्यक्ष, नाभिक युवा सेना, नाशिक शहर , प्रतिभा सूर्यवंशी, अशोक ईशी उपशहराध्यक्ष, नाशिक शहर, किरण शिंदे शहर कार्याध्यक्ष, नाभिक युवा सेना, दिलीप बोरसे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष रायकर (जिल्हा उपाध्यक्ष), सुनील कदम (युवा नेते ) नितीन वाघ उत्तर महाराष्ट्र संघटक, तुषार बिडवे जिल्हा सरचिटणीस, अशोक इशी उप शहर अध्यक्ष, सुरेश चित्ते सोमनाथ शिंदे, कारण सूर्यवंशी, करण शिंदे, शिरीष जांभळे. अजय निकम, ऋषिकेश कदम, प्रेमभदाणे, यांच्या सह्या आहेत.