कळवण – हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या प्रथा,रुढी,पंरपरा आणि चालीरीतींना फाटा देत विधायक सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेत रक्षा विसर्जनाची परंपरा कळवण तालुक्यातील भेंडी या गावाने बंद केली आहे. रक्षा विसर्जन नदीत न करता घरासमोर झाड लावून त्या खड्ड्यात केली जाणार आहे.
भेंडी येथील माजी सरपंच शिवाजी रौदळ व सामाजिक कार्यकर्ते भास्कर रौदळ यांचे वडील सहादू उखा रौदळ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. अंत्यसंस्काराच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या रक्षेचे विसर्जन हे गिरणा नदीत न करता घराजवळ खड्डा करून त्यात त्यांच्या नावाने एक झाड लावून त्याच्या कुटुंबाने त्या झाडाचे संगोपन करण्याचा निर्णय रौंदळ कुटुंबीयांनी व भेंडी ग्रामस्थांनी घेऊन पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचे काम केले आहे.
या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले
आज सोमवार (ता.८) रोजी राक्षविसर्जनचा कार्यक्रम होता. अस्थींसह जमा केलेली राख त्यांच्या स्वतःच्या मळ्यात केलेल्या वृक्षारोपणच्या रोपांना टाकत पर्यावरण रक्षणाचा दुहेरी संदेश दिला. भेंडी गावात हा उपक्रम कायम करण्यासाठी चर्चा करून वृक्षारोपणाचा संदेश प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला जाईल. तसेच प्रत्येक कुटुंबियांने या पद्धतीने वृक्षारोपण करत पर्यावरणपूरक उपक्रम राबवला जावा व आपल्या प्रियजनांच्या आठवणी वृक्षाच्या रुपात जिवंत ठेवाव्यात अशी इच्छा रौदळ कुटुंबीयांनी यावेळी व्यक्त केली. वडिलांच्या स्मृती झाडाच्या रुपात असाव्यात म्हणून आम्ही साऱ्या बहिणींनी आमच्या भावांच्या घरासमोर वृक्षारोपण केले.”
यशोदाबाई पगार, खुंटेवाडी, ता.देवळा