मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालयासह ४३० खाटांच्या रूग्णालयास मान्यता

by India Darpan
फेब्रुवारी 10, 2021 | 3:20 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक – नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यामार्फत सूरू करण्यात येणार आहे.
  नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे सतत प्रयत्न सुरू होते.यासाठी त्यांनी अनेक बैठका ह्या वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे व संबंधित अधिकाऱ्यांसोबत घेतल्या होत्या.
या महाविद्यालया बाबत बोलताना श्री. भुजबळ पुढे म्हणाले की मुंबईसारख्या शहरांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांचा विकास व आधुनिकीकरण जागेअभावी मर्यादा आल्या असल्याने त्याला पर्याय म्हणून उच्च गुणवत्तेचे वैद्यकीय शिक्षण आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा देऊ शकेल असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक येथे विकसित करता येणे आता शक्य आहे. नाशिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिनस्त असणार आहे. यात 100 विदयार्थी  प्रवेश क्षमतेचे नविन वैदयकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित 430 रुग्णखाटांचे रुग्णालय तसेच 15 विषयांमध्ये एकूण 64 पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नविन जागा निर्माण करण्यास आज मंत्रीमंडळाने  आज मंजूरी दिली आहे.    त्यामुळे आम्ही राज्यातील इतर वैद्यकीय महाविद्यालयांसाठी रोल मॉडेल म्हणून विकसित करू असा विश्वास श्री भुजबळ यांनी व्यक्त केला. प्रस्तावित वैदयकीय महाविद्यालय व त्यास  संलग्नित रुग्णालयासाठी सुमारे रु. 627.62 कोटी इतका खर्च अपेक्षित आहेत.
याबाबत माहिती देताना श्री भुजबळ म्हणाले की  नाशिक हा लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील मुंबई-पुणे खालोखाल तिसरा मोठा जिल्हा आहे.नाशिक जिल्ह्यात ७ आदिवासी तालुके असून एकूण लोकसंख्येच्या २३% आदिवासी लोकसंख्या आहे त्यामुळे जनहिताचा विचार करता या मेडिकल कॉलेजची गरज भासत होती. मेडिकल कॉलेज झाले पाहिजे ही नाशिककरांची गेले अनेक दिवसांपासूनची मागणी होती. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मी सातत्याने यासाठी प्रयत्न करत होतो आज मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली आहे. प्रस्तावित वैदयकीय महाविद्यालय व पदव्युत्तर पदवी महाविद्यालयाने नाशिक च्या विकासात  भर पडणार आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

डिसले गुरुजी घेणार आता राज्यभरातील शिक्षकांची कार्यशाळा

Next Post

रोजंदारी कर्मचाऱ्यांचा आदिवासी विकास भवनावर पायी मोर्चा, आत्मदहनाचा प्रयत्न

India Darpan

Next Post
IMG 20210210 WA0059

रोजंदारी कर्मचाऱ्यांचा आदिवासी विकास भवनावर पायी मोर्चा, आत्मदहनाचा प्रयत्न

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011