नाशिक – लॅाकडाऊन नंतर बस सेवा आंतर जिल्हा बस वाहतुक सुरु झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी सहा वाजपर्यंत २० बसेस नाशिक येथून पुणे, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, कसारा, बोरिवली, वैजापूर या मार्गांवर अन्य जिल्ह्यात सोडण्यात आल्या. प्रत्येक बस मध्ये १६ ते १८ इतके प्रवाशी होते. शुक्रवारी सुध्दा या बस वाहतुकीला हळूहळू प्रतिसाद मिळत आहेत.
त्याचप्रमाणे सटाणा, कळवण, मालेगाव, नांदगाव, मनमाड, येवला, सिन्नर पेठ या तालुक्याच्या ठिकाणी वरून देखील नाशिक करता दर एक ते दोन तासांनी बसेस सोडण्यात येत आहेत. सदर तालुका ते नाशिक या मार्गावर प्रत्येक फेरीस २२ च्या आसपास प्रवाशी मिळत आहेत. शुक्रवारी प्रवाशी गर्दी पाहून अतिरिक्त बसेस सोडण्याचे नियोजन एसटी प्रशासनाने केले. त्यामुळे प्रवाशांना सुध्दा दिलासा मिळाला आहे.