नाशिक – राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने भद्रा मारुती दर्शनासाठी विशेष शिवशाही बस दर शनिवारी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही बस खुलदाबाद, वेरुळ, घृष्णेश्वर, येथे जाऊन परत नाशिकला येणार आहे. दर शनिवारी सकाळी ७ वाजता नवीन बस स्थानक येथून ही बस सुटणार आहे. त्यानंतर ती सायंकाळी ६ वाजता नाशिकला परत येईल. या परिक्रमासाठी या विशेष शिवशाही बसचे भाडे ६९५ तर जेष्ठांसाठी ४०० रुपये असणार आहे. आरक्षण आकार १० रुपये वेगळे असणार आहे. या बसच्या आरक्षणसाठी NSKCBS TO NSK VIA KUTB या सांकेतीक कोडचा वापर करता येईल.