नाशिक – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील खडतर प्रवास नाशिककरांना राष्ट्रीय भाषेतून कळावा याकरिता अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी युवक काँग्रेस, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पालकमंत्री छगन भुजबळ , माजी खासदार समीर भुजबळ, समता परिषदचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांच्या प्रेरणेतून युवक राष्ट्रवादी शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी कवी कालिदास कला मंदिर नाशिक येथे नाटक आयोजित केले होते. दिग्दर्शक राजेश शर्मा यांनी लिहिलेल्या नाटकाकरिता प्रवेश मोफत ठेवण्यात आला होता.
स्वातंत्रपूर्व काळात बहुजन व अस्पृश्य समाजाला अनेक असह्य यातना भोगाव्या लागत होत्या. या अन्यायाला वाचा फोडत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुरोगामी विचारांची मांडणी केली. महिलांना समाजात मान मिळावा त्यांची प्रगती व्हावी याकरिता सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा भिडे वाडा येथे सुरु केली. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांचे प्रेरणादायी कार्य व जीवनप्रवास नाशिककरांना नाट्यरूपाने सविस्तरपणे कळावे याकरिता हिंदी नाटकाचे मोफत आयोजन करण्यात आले होते.
या नाट्य प्रयोगाच्या शुभारंभ प्रसंगी हिराबाई खैरे, बाळासाहेब कर्डक, नगरसेविका सुषमा पगारे, माजी नगरसेविका कविताताई कर्डक, शाम लोंढे, योगेश कमोद, धनंजय निकाळे, उदय सराफ, भालचंद्र भुजबळ, रवी जन्मावर ,योगेश थोरात, शंकर मोकळ, मकरंद सोमवंशी, जय कोतवाल, सागर बेदरकर, रोहित जाधव, संदीप गांगुर्डे, संदीप खैरे यांच्या सह नाट्य रसिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.