कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ पर्यंत
– जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ७९ हजार ८५६ रुग्ण कोरोनामुक्त
– सद्यस्थितीत ३५ हजार ८५१ रुग्णांवर उपचार सुरू
नाशिक -जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ७९ हजार ८५६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३५ हजार ८५१ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार ५८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ९०२, चांदवड ९९७, सिन्नर १ हजार ०२, दिंडोरी ७६१, निफाड २ हजार २०८, देवळा १ हजार १९६, नांदगांव ८१६, येवला ४३५, त्र्यंबकेश्वर ३४६, सुरगाणा १९९, पेठ ८८, कळवण ५१३, बागलाण १ हजार १४४, इगतपुरी ५३०, मालेगांव ग्रामीण ९४७ असे एकूण १२ हजार ०८४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २१ हजार ३५७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात २ हजार २७ तर जिल्ह्याबाहेरील ३८३ असे एकूण ३५ हजार ८५१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात २ लाख १८ हजार २९४ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८१.३० टक्के, नाशिक शहरात ८३.३३ टक्के, मालेगाव मध्ये ७६.५० टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.५३ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८२.३९ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण १ हजार ६१, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार २२५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २१८ व जिल्हा बाहेरील ८३ अशा एकूण २ हजार ५८७ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– २ लाख १८ हजार २९४ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख ७९ हजार ८५६ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ३५ हजार ८५१ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८२.३९ टक्के
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)