नाशिक – मेट संस्थेच्या इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी कॉलेज सोसिअल वेलफेअर सेलच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील ”मेट अर्पण पर्व तिसरे” या व्याख्यानमालेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन केले होते. यात पहिले पुष्प यजुवेंद्र महाजन सर यांनी गुंफले. त्यात त्यांनी Attitude अँण्ड SKILLS REQUIRED FOR २१ CENTUARY YOUTH या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सद्य परिस्थितीत विविध कौशल्य आत्मसात करून रोजगार व उद्योगात यश कसे संपादन करता येईल याबद्दल ते बोलले. तर दुसरे पुष्प प्राध्यापक अमोल पाटील यांनी “शिव चरित्र व आजचा समाज” या विषयावर आपले परखड मत मांडले. तिसरे पुष्प डॉ. हमीद दाभोळकर यांनी “मानसिक आरोग्य व अंधश्रद्धा निर्मूलन” या महत्वपूर्ण विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मानसिक आरोग्य, ताणतणाव,व्यसनांमुळे होणारे दुष्परिणाम, नवीन पिढी व व्यसनांचे सेवन व त्यामुळे होणाऱ्या आत्महत्या या सर्वांविषयी आपल्या विशिष्ट शैलीत ते बोलले.
या व्याख्यानमालेत समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आमंत्रित करून त्यांचे व्याख्यान आयोजित केले जाते. ज्याचा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवर व व्यक्तिगत विकासावर सकारात्मक परिणाम होतो. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास, समाजाप्रती त्यांच्या जबाबदाऱ्या याची जाणीव करून देण्यासाठी व्याख्यान मालेचे आयोजन केले जाते. परंतु, यावर्षी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता यंदाची व्याख्यानमाला वेगळ्याप्रकारे म्हणजे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले. प्राध्यापक पावन उदावंत व राहुल साबळे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली मेट अर्पण पुष्प ३ व्याख्यानमालेचे यशस्वीपणे नियोजन केले ज्याला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.