मुलीची छेड काढली, चार जणांनी १७ वर्षीय मुलास केली बेदम मारहाण
नाशिक : मुलीची छेड काढली या कारणातून चार जणांच्या टोळक्याने १७ वर्षीय मुलास बेदम मारहाण केल्याची घटना शिवाजीनगर भागात घडली. या घटनेत हॉकीस्टीकचा वापर करण्यात आल्याने मुलगा जखमी झाला असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमोद जाधव व त्याचे तीन साथीदार अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी शुभम प्रमोद गडदे (१७) या मुलाने तक्रार दाखल केली आहे. गडदे सोमवारी (दि.८) दुपारच्या सुमारास शिवाजीनगर परिसरातील भवर टावर येथील न्यु महेंद्र स्विटजवळ उभा असतांना ही घटना घडली. शुभम गडदे व त्याचा मित्र उभा असतांना तीन मुली तेथून जात होत्या. यावेळी एका मुलीने त्यास काय बघतो असे म्हटले असता त्याने प्रत्युत्तर केले. त्यामुळे संतप्त टोळक्याने त्यास मुलींची छेड काढतो काय असे म्हणत बेदम मारहाण केली. यावेळी एकाने हॉकीस्टीक डोक्यात मारल्याने शुभम गडदे जखमी झाला असून अधिक तपास पोलीस नाईक चौधरी करीत आहेत.
…..