नाशिक – मिशन झिरो अंतर्गत ५९ व्या दिवशी स्मार्ट हेल्मेट द्वारे थर्मल स्क्रिनिंग शहरातील वेगवेगळ्या भागात ५८९ नागरिकांच्या अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी १२२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आलेत. आजपर्यंत एकूण ७०३४६ अँटिंजेन चाचण्या झाल्या असून त्यात ११८०१ पॉझिटिव्ह शोधण्यात यश आले आहे. या अभियनामुळे ५८५४५ व्यक्तींची भीती दूर होऊन त्यांना दिलासा मिळाला.
अँटीजेन चाचण्यांच्या माध्यमातून पॉझिटिव्ह रुग्णांना हुडकून काढण्यात यश येत असतांना बाजारपेठेतील गर्दीवर प्रभावीपणे लक्ष् ठेवणे महत्वाचे होते. ही गोष्ट हेरून भारतीय जैन संघटना (बीजेएस) यांच्या तर्फे स्मार्ट हेल्मेट द्वारे बुधवारी नवीन पंडीत कॉलनी, बाल गणेश मंदीर, अशोक स्तंभ, घारपुरे घाट परिसर या परिसरात नागरिकांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात आली . त्यात ६१६० च्या वर नागरिकांचे स्क्रीनिंग होऊन ८३ लोकांना संशयित म्हणून स्मार्ट हेल्मेट तंत्रज्ञानाने शोधण्यात आले. त्यापैकी ७५ लोकांनी अँटीजेन चाचण्या करून घेतल्यात व त्यातून ७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. अशा प्रकारे गर्दीच्या ठिकाणाहून होणारा संसर्ग रोखण्यात स्मार्ट हेल्मेटची मदत झाली आहे. सतरा दिवसात ९३९५५ च्यावर नागरिकांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात आले तर त्यापैकी १२१६ नागरिकांना संशयित म्हणून शोधून पुढील चाचण्या करण्यात आल्या.
मनपाच्या सहाही विभागातील सर्व पक्षीय नगरसेवक यांच्या सहकार्याने बुधवारी ९ मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन, गटां द्वारे तपासणी करून पॉझिटिव्ह रुग्ण शोधून काढण्यात व उर्वरित नागरिकांचे समुपदेशन करून त्यांना धीर देण्यात फिल्ड वरील कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना व कार्यकर्त्यांना यश आले आहे. विशेष म्हणजे फिल्ड वर काम करीत असताना २० च्या वर आरोग्य कर्मचारी स्वतः बाधित होऊनही मिशन झिरो निरंतर सुरु असल्याची माहिती या अभियानाचे प्रकल्प संयोजक नंदकिशोर सांखला यांनी दिली.