नाशिक – जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे एक अभ्यासु व्यक्तीमत्व हभप.माधव महाराज (शास्री) घोटेकर खेडलेकर यांची नुकतीच महाराष्ट्र वारकरी महामंडळ जिल्हा उपाध्यक्षपदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. महामंडळाची बैठक तालुकाध्यक्ष हभप हरिश्चंद्र आप्पा भवर यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. जिल्हाध्यक्ष हभपआण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. माधव महाराज शास्री यांच्या निवडीचे प्रदेशाध्यक्ष आर.के.रांजणे, कार्याध्यक्ष हभप रामेश्वर महाराज शास्री,द्वाराचार्य हभप रामकृष्ण महाराज लहवीतकर,मार्गदर्शक समिती प्रमुख हभप पंडीत महाराज कोल्हे,मार्गदर्शक समिती प्रमुख हभप श्रावण महाराज आहिरे,जिल्हा उपाध्यक्ष हभप चंद्रकात दादा आहेर,जिल्हा कार्याध्यक्ष हभप बाळकृष्ण महाराज शास्री,कोषाध्यक्ष हभप बाळासाहेब महाराज कबाडे,कोषाध्यक्ष दत्तात्रय पा.डुकरे,तालुकाअध्यक्ष हभप हरिश्चद्र आप्पा भवर,युवा समिती जिल्हा उपप्रमुख राजेंद्र महाराज थोरात,व सर्व महामंडळ कमिटीने स्वागत केले आहे.